जा, प्रेम करा! इथं सरकार देतंय आठवडाभर सुट्टी
प्रेम हे प्रत्येकासाठी खास असतं. प्रेमात लोक काहीही करायला तयार असतात.
असाही एक देश आहे जिथे प्रेम करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे.
चीन सरकारने कॉलेज तरुणाईला प्रेमात पडण्यासाठी आठवडाभराची सुट्टी जाहीर केलीये.
चीनमध्ये विद्यार्थ्यांना 7 दिवसांचा 'लव्ह ब्रेक' देण्यात आलाय. कारणही तसंच आहे.
एनसीबीच्या रिपोर्टनुसार, मियांयांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने 21 मार्च रोजी पहिल्यांदा स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली.
1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांना प्रेमात पडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
निसर्गाशी प्रेम, जीवनाशी प्रेम आणि आयुष्यातील जोडीदारावर प्रेम करण्यासाठी 7 दिवसांचा स्प्रिंग ब्रेक देण्यात आलाय.
चीनमध्ये घटता जन्मदर चिंतेचा विषय बनला आहे. त्यापार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
चीनमध्ये देण्यात आलेल्या या प्रेमात पडण्याच्या सुट्ट्यांची भारतात जोरदार चर्चा रंगली आहे.