एका दिवसात हनीमून
नवऱ्याविरोधात
नवरीची
पोलिसात तक्रार
लग्नानंतर कपल उत्साहित असतं ते हनीमूनसाठी.
असंच आग्र्यातील कपल हनीमूनसाठी शिमल्याला गेलं होतं.
पण हे कपल एका दिवसातच हनीमून आटोपून घरी परतलं.
त्यानंतर नवरीबाईने नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बायकोने नवऱ्याविरोधात तक्रार दिली, पोलिसांनीही FIR दाखल केला.
एप्रिल 2022 साली लग्नानंतर 10 दिवसांनी ते हनीमूनला गेले.
हनीमूनदिवशी नवरा GF सोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत होता.
संतप्त बायकोने विरोध केल्यावर नवऱ्याने तिला मारहाण केली.
डिसेंबर 2022 साली तिचा नवरा तिला सोडून कॅनडात गेला.
जानेवारी 2023 मध्ये तो परतला आणि तिचा छळ करू लागला.
तिला दुसरं लग्न करण्याची धमकीही देऊ लागला.
फेब्रुवारी 2023 मध्ये महिला सासर सोडून माहेरी निघून गेली.
नवऱ्याने तिला माहेरीही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेने नवरा, सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
हुंड्यासाठी छळ, मारहाण असे गुन्हे दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.