भारतात अगदी पूर्वापासून जमिनीवर मांडी घालून बसून जेण्याची पद्धत आहे 

मात्र आजकाल बहुतेक लोक जेवताना डायनिंग टेबलचा वापर करून खुर्चीवरच बसतात

अशात जमिनीवर बसून जेवणाचे हे फायदे त्यांनी नक्कीच वाचले पाहिजे. जमिनीवर बसून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. 

जमिनीवर बसून नियमित अन्न खाल्ल्यास शरीराची मुद्रा बरोबर राहते 

पचनक्रियाही चांगली होते. आयुर्वेदात सांगितलं आहे की, अन्न जमिनीवर बसूनच खावं.

जमिनीवर बसून जेवताना सतत पुढे वाकावे लागते, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. 

त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते.

मणक्याच्या खालच्या भागावर दाब पडतो आणि येथील स्नायूही मजबूत होतात.

गुडघ्यांसाठी एक उत्कृष्ट व्यायाम आहे. असं बसल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

जमिनीवर बसून अन्न खाल्ल्यास हृदयापर्यंत रक्ताभिसरण सुलभ होते, त्यामुळे इतर समस्या कमी होतात.