तुम्ही आजवर
केळी, अंडी खाल्ली असतील.
पण आता या दोघांचा
अनोखा उपयोग समोर आला आहे.
गॅरी पिलारचिक नावाच्या गार्डनरने हा अनोखा प्रयोग केला.
त्याने एक खड्डा खणून त्यात दोन केळी आणि तीन अंडी टाकली.
त्यानंतर वरून माती टाकून
हा खड्डा बंद केला.
काही कालावधीनंतर त्याजागी टोमॅटोच्या बिया टाकल्या.
त्या जागी टोमॅटोचं रोप बहरल्याचं त्याने व्हिडीओत सांगितलं.
जमिनीतील केळी-अंडीने टोमॅटोच्या रोपासाठी
खताचं काम केलं.
द रस्टेड गार्डन युट्यूब चॅनेलवर
हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.