खराब बेडशीटमुळे लागते आग?
प्रत्येक घरात बेडशीट वापरलं जातं. स्वच्छ ताजं बेडशीट असेल तर फ्रेश वाटतं.
खराब बेडशीटवर झोपल्यावर फ्रेशही वाटत नाही आणि रोगराई जास्त प्रमाणात पसरते.
खराब बेडशीटमुळे आगही लागू शकते ही गोष्ट सध्या समोर आली आहे.
स्लीप फाऊंडेशेनच्या अहवालानुसार, प्रत्येक व्यक्ती चादरीवर सरासरी 49 ते 60 तास घालवते.
जर बेडशीट घाण असेल तर तुम्ही धूळ, घाम यांच्यामध्ये जगत आहात.
लंडन फायर ब्रिगेडने इशारा दिला की, इमोलिएंट्स किंवा स्किन क्रीम्सचे अवशेष बेडशीटवर जमा होऊ लागतात.
तुम्ही वापरणाऱ्या क्रिम्स किंवा ओषधं अत्यंत ज्वलनशील असतात आणि उन्हाळ्यात आग लावू शकतात.
एक चतुर्थांश लोकांच्या बेडवर पाळीव प्राणी येऊन झोपत असतात.
बेडशीट आठवड्यातून एकदा धुणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही याची काळजी घेण्याची गरज आहे.