भारत आपल्या विशाल भौगोलिक क्षेत्राव्यतिरिक्त सांस्कृतिक विविधतेसाठीही ओळखला जातो. भारतातील खेड्यापाड्यात शेकडो वर्ष जुन्या अनोख्या परंपरा आजही आहेत 

अशीच एक अनोखी परंपरा झारखंडच्या लातेहार गावात आहे. जिथे माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही एक दिवस सुट्टी दिली जाते. 

ही परंपरा त्यांच्या पूर्वजांनी सुरू केल्याचे गावकरी सांगतात. आजही गावातील सर्व लोक त्याचं पालन करत आहेत. 

लातेहार गावातील लोकांचा असा विश्वास आहे की येथे वर्षानुवर्षे प्राणी आणि मानव यांचं नातं असंच चालत आलं आहे.

माणूस ज्या प्रकारे आपल्या सुख-सुविधांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या सुख-सुविधांचीही इथे काळजी घेतली जाते. 

गावात रविवारी सर्व प्राण्यांना सुट्टी दिली जाते आणि या दिवशी त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. 

तिथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, माणसाला जशी एक दिवस विश्रांती असते, त्याचप्रमाणे प्राण्यांनाही विश्रांतीची गरज असते 

गावकरी सांगतात, की सुमारे दहा दशकांपूर्वी एकदा शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता 

यानंतर गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की या प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती दिली जाईल

तेव्हापासून आजतागायत गावकऱ्यांकडून गुरांना सुट्टी देण्याची परंपरा पाळली जात आहे. याशिवाय जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही हाच ट्रेंड दिसून येतो.