कोणी भाऊ, तर कोणी मैत्रिण; नामिबियातून भारतात येणाऱ्या 8 चित्त्यांबद्दल तुम्हाला माहितीयत 'या' गोष्टी?
Heading 3
नामीबियाच्या जंगलातून 16 सप्टेंबरला रात्री एक जंबो जेट भारतात येणार आहे. ही घटना ऐतिहासिक आहे, म्हणून हा स्पेशल जेट सज्ज झाला आहे.
भारत सरकारने 1952 मध्ये चित्ता देशातून नामशेष झाला म्हणून घोषित केलं. ज्यानंतर आफ्रिकेतून या 8 चित्त्यांना आणलं जाणार आहे.
आफ्रिकेतून येणाऱ्या या प्राण्यांना मध्य-भारतातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलं जाणार आहे.
CCF नुसार, चित्यांच्या या पहिल्या तुकडीत, दोन नर येणार आहेत हे दोघेही साडेपाच वर्षांचे, तर त्यांच्यासोबत आणखी साडेचार वर्षांचा चित्ता भारतात पाठवला जाणार आहे
या गटातील सर्वात लहान मादा चित्ता अवघ्या दोन वर्षांची आहे. तिच्यासोबत एक अडीच आणि एक तीन वर्षांची मादा चित्ता येणार आहे.
याशिवाय भारतात पाठवल्या जाणार्या दोन मादा चित्ता, ज्या आपापसात मैत्रिणी आहेत. या दोघींचे वय सुमारे ५ वर्षे आहे
चित्ता संवर्धन निधी (CCF) ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे आणि ते भारतीय अधिकार्यांच्या सहकार्याने या संपूर्ण मिशनची देखरेख करत आहे.
चित्त्याचे सरासरी जीवन चक्र 8-12 वर्षांच्या दरम्यान असते. त्यांची आई दीड वर्षांचे होईपर्यंत काळजी घेते आणि नंतर त्यांना शिकार करायला एकटं सोडते.
या वर्षी 20 जुलै रोजी भारताकडून नामिबियासोबत करार करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी भारताला आठ चित्ते दिले आहे. जेणे करुन भारतात चित्ता लूप्त होणार नाही.