रात्रीच्या वेळी शेतात दररोज एक बिबट्या यायचा. शेतकऱ्याच्या शेतात अनेक प्राणी होते, पण एकाला ही बिबट्याने काहीच केलं नाही.
त्यानंतर शेतकऱ्याला प्रश्न पडला की हा बिबट्या नक्की करतो तरी काय? शिकार करायचीच नसते, मग तो माझ्या शेतात का येतो?
बिबट्याचं असं वागणं पाहून शेतकऱ्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तेव्हा त्याने सीसीटीव्ही लावले
त्यावेळी शेतकऱ्याला जे दिसलं त्यावर त्याला स्वत:ला ही विश्वास बसत नव्हता
शेतकऱ्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला, पण त्यांना विश्वास बसला नाही आणि ते शेतकऱ्यावर हसू लागले
त्यानंतर शेतकऱ्याने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवले, जे पाहून पोलिसांना धक्का बसला
त्या फुटेजमध्ये असं होतं काय? तर बिबट्या आणि गाय, खरंतर त्या शेतात बिबट्या गायीसाठीच यायच, पण तिला खाण्यासाठी नाही तर तिच्या प्रेमापोटी
बिबट्या शेतकऱ्याच्या गायीजवळ जाऊन बसायचा आणि तिच्याशी संवाद साधायचा.
बिबट्याच्या येण्यामुळे गायी घाबरलेली दिसत नव्हती, उलट ती बिबट्याचीच वाट पाहात असावी असंच व्हिडीओत दिसतंय
व्हिडीओत पुढे गाय बिबट्याला चाटायला लागली जणू ती त्याचे स्वागत करत होती आणि बिबट्या देखील फार आनंदी होता.
बिबट्यानंतर गुरगुर करु लागला जणू काही त्याला गायीच्या प्रेमामुळे दिलासा मिळाला होता
निसर्गाला आव्हान देणारा हा क्षण खरंच धक्का बसण्यासारखाच आहे