लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाहेरच्या गोष्टी खाण्याची आवड असते.
त्यातीलच एख गोष्ट म्हणजे चीप्स. जे तुम्ही कुठेही सहज घेऊन जाऊ शकता, खाऊ शकता.
चिप्स पॅकेटविषयी तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली का? ती म्हणजे चीप्स पॅकेटमध्ये हवा भरलेली असते.
चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरली असते याविषयी जाणून घेऊया.
असा समज आहे, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी चीप्समध्ये हवा भरलेली जाते मात्र हे चुकीचं आहे.
चिप्स खराब किंवा शिळे होऊ नये म्हणून त्यात हवा भरली जाते.
नायट्रोजन वायु चिप्स पॅकेटमध्ये भरला जातो. त्यामुळे पॅकेट्सची शेल्फ लाइफ 40 ते 55 दिवस टिकते.
नायट्रोजन वायुमुळे पॅकेटमधील चिप्स बराच काळ ताजे राहू शकतात.
नायट्रोजन अन्न साठवण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.