कधी पाहिलीये का कलरफुल नदी?

तसं पाण्याला कोणताही रंग नसतो. पण इतर गोष्टींमुळे पाण्याला रंग येतो.

पांढराशुभ्र धबधबा, निळाशार समुद्र, पारदर्शक किंवा काळसर नदी तुम्ही पाहिली असेल.

पण तु्म्ही कधी कलरफुल नदी पाहिली आहे का?

कोलंबियातील कॅनो क्रिस्टेल्स नदीचं पाणी कलरफुल आहे.

या नदीला गार्डन ऑफ ईडन किंवा लिक्विड रेनबो म्हणूनही ओळखलं जातं. 

शेरेनिया डे ला मॅकरिना पर्वत शृखंलांमधून ही नदी वाहते.

जुलै ते नोव्हेंबर महिन्यात ही नदी पाहण्यासाठी कित्येक पर्यटक येतात. 

एखाद्या सुंदर पेटिंगप्रमाणे ही नदी पाच रंगांत वाहते. 

लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि काळा असे रंग या नदीत पसरलेले असतात.

नैसर्गिकरित्या या नदीचं पाणी निळं आहे. 

या नदीत सर्वात जास्त दिसणारा रंग आहे लाल. 

कारण मॅकेरिनिया क्लेविगेरा ही विशेष प्रकारची वनस्पती नदीच्या पृष्ठभागावर आहे. 

याशिवाय पाण्यात काळी दगडं, हिरवी वाळू आणि पिवळी शेवाळं आहेत.

ही नदी म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्य जमिनीवरच अवतरल्यासारखं वाटतं.