विचित्र फूड फ्युजनचे 5 व्हायरल Video
पावभाजीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील मात्र कधी पावभाजी आईस्क्रिम खाल्लीय का? सध्या पावभाजी आईस्क्रिमचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्यक्तीने इतके पदार्थ टाकत मॅगी बनवलीय की ती मॅगी आहे की खिचडी हा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.
व्हिडिओमध्ये मॅगी करताना त्यामध्ये क्रीम, लोणी, चीज, सॉस आणि विविध प्रकारच्या भाज्या टाकल्या आहेत.
तुम्ही चहा खूप वेळा प्यायला असेल मात्र कधी फ्रूट चहा प्यायलाय का?
या व्हिडीओमध्ये व्यक्ती विविध फळं टाकत चहा बनवतोय.
समोस्याचेही मार्केटमध्ये नवनवीन प्रकार आले आहेत.
या व्हिडीओमध्ये व्यक्ती पालक पनीर समोसा बनवताना दिसतोय.
आंब्याचा सीझन आल्यापासून विक्रेते फूड फ्युजनमध्ये आंब्याचा वापर करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये व्यक्तीने चक्क मॅंगो ऑमलेट बनवलं आहे.