जगातील सर्वात लहान कार

ऑस्टिन 7 ही जगातील सर्वात लहान कारपैकी एक आहे. ही एक इकॉनॉमी कार असून ऑस्टिनने युनायटेड किंगडममध्ये 1923 ते 1939 पर्यंत तयार केली होती. याला "बेबी ऑस्टिन" असे टोपणनाव देण्यात आले होते.

फियाट 500 :  फियाट 500 या कार "टोपोलिनो" म्हणून ओळखली जाते. 1936 ते 1955 पर्यंत फियाटने उत्पादित केलेली एक इटालियन सिटी कार आहे. फियाट 500 ला  'मिकी माऊस' हे इटालियन नाव देखील आहे.

फोक्सवॅगन बीटल : फोक्सवॅगन बीटल ही कार 1938 मध्ये लाँच करण्यात आलेली होती. ही कार फार लोकप्रिय ठरली 1938 पासून ते 2003 पर्यंत या कारचे उत्पादन आणि विक्री सुरु होते.

रेनॉल्ट 4 सिवी : रेनॉल्ट 4 सिवी ही कार 1947 साली लाँच करण्यात आली होती.

वोल्वो पीव्ही 444 :  वोल्वो पीव्ही 444 ही अमेरिकन बनावटीची ही कार 1946 साली लाँच करण्यात आली होती.

मॉरिस मायनर : मॉरिस मायनर ही आयकॉनिक कार आहे. ही कार 1948 ला लाँच करण्यात आली आणि पुढील 25 वर्ष या कारची क्रेज कायम होती. मॉरिस मायनरच्या 10 लाख गाड्या विकल्या गेल्या होत्या.

सिट्रॉवेन 2 सीव्ही : सिट्रॉवेन 2 सीव्ही ही कार 1948  रोजी लाँच करण्यात आली होती. जवळपास 40 वर्ष या कारचे उत्पादन सुरु होते. ही जगातील सर्वात लहान कार पैकी एक आहे.

फियाट 600 : फियाट 600 ही लागतील सर्वात लहान कार पैकी एक असून तिची लांबी केवळ 12 फूट इतकी आहे परंतु तरीही यात 6 जण बसू शकतात. 1955 रोजी ही कार लाँच करण्यात आली होती.

बीएमडब्लू 700 : बीएमडब्लू 700 देखील 1959 रोजी लाँच झालेल्या सर्वात लहान कार पैकी एक आहे.

फोर्ड अँग्लिया : फोर्ड अँग्लिया ही कार 1959 मध्ये लाँच करण्यात आली होती.