गोळ्या-औषधांच्या रंगांचा रोगाशी काही संबंध आहे की केवळ औषधांना आकर्षक बनवण्यासाठी ते रंगवले जातात? आम्ही तुम्हाला औषधांच्या रंगाशी संबंधित रहस्य सांगणार आहोत.
अहवालानुसार, जेव्हा मानवी जीवनाचा विकास होत होता, तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि औषधांचा शोध लावला.
त्यावेळी ती औषधं गोळ्या आणि कॅप्सूलच्या स्वरूपात नसून वनस्पतींच्या स्वरूपात होती.
नंतर त्या झाडांचा रस काढून त्याचे पावडरमध्ये रूपांतर करून गोळ्या बनवल्या गेल्या.
युरोपमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंतर, 1960 च्या सुमारास औषधे पांढर्या गोळ्यांच्या स्वरूपामध्ये तयार केली जाऊ लागली.
नंतर, उच्च तंत्रज्ञानाच्या विकासासह, औषधांच्या निर्मितीमध्ये देखील बदल केले गेले.
1975 च्या सुमारास रंगीबेरंगी कॅप्सूल तयार होऊ लागल्या. तसेच औषधांच्या रंगात वेगवेगळे रंग टाकण्यात आले.
अहवालानुसार, आता औषधांच्या कॅप्सूल तयार करण्यासाठी 75000 हून अधिक रंग वापरले जातात.
खरं तर औषधे रंगीबेरंगी केली जातात कारण ज्यांना औषधांची नावे वाचून फरक करता येत नाही, ते औषधांचा रंग पाहून औषधांमध्ये फरक करू शकतात.
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की औषधांच्या रंगाचा काही आजारांशीही संबंध असतो.
ज्या आजारांमध्ये कमी परिणामकारक औषधे द्यावी लागतात, त्यांचा रंग हलका ठेवला जातो.
तात्काळ प्रभावासाठी बनवलेल्या जड डोसचा रंग डार्क ठेवला जातो. एवढेच नाही तर वास आणि चव यानुसार औषधांचा रंगही ठरवला जातो.