टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी पाणबुडीतून गेलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे 

टायटन पाणबुडीवर बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते.

समुद्रात 13 हजार फूट खाली गेलेली टायटन पाणबुडी 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली 

टायटॅनिक टुरिजमसाठी ओशन गेट कंपनीची पाणबुडी 18 जूनला निघाली होती. 

पण सुरुवातीच्या काही तासातच संपर्क तुटला होता. 

पाणबुडीची शोधमोहिम बराच काळ सुरू होती.

शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. 

अवशेषाच्या प्राथमिक विश्लेषणात असं दिसतं, की टायटन पाणबुडी स्फोटामुळे बुडाली होती. 

त्याच्या उपकरणात किंवा ऑक्सिजन टाकीत स्फोट झाल्याची शक्यता आहे 

अवशेषाचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतरच अपघाताचं कारण स्पष्ट होऊ शकेल, असं ओशनगेटने म्हटलं