झक्कास! Whatsappवर येतंय खास फीचर

व्हॉट्सअप आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. 

अलीकडच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपनं खास फीचर्स उपलब्ध करुन दिली आहेत. 

आत्तासुद्धा व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. 

हे नवं फीचर काय आहे आणि ते कसं काम करेल, हे आपण पाहणार आहोत.

 व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetalnfoनं ही माहिती दिली आहे.

या नव्या फीचर्सच्या माध्यमातून युजर्स तारखेनुसार मॅसेज सर्च करू शकतील. 

या नव्या फीचरला मॅसेज बाय डेट असं नाव देण्यात आलं आहे. 

हे नवं फीचर व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी उपयोगी ठरणार आहे. 

हे फीचर आल्यावर सर्च सेक्शनमध्ये एक नवं कॅलेंडर आयकॉन दिसेल. 

त्यामध्ये टाईप करताच युजर्सना तारिखनिहाय मॅसेज पाहता येतील. 

मोठी चॅट हिस्ट्री असणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. 

याशिवाय नव्या फीचरमुळं ग्रुप चॅट हिस्ट्रीसुद्धा तारीखनिहाय दिसू शकेल.