गाडीचं मायलेज वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

त्यामुळं गाडीच्या इंधनावर प्रचंड खर्च होतो. 

जर तुमच्या वाहनाचं मायलेज चांगलं असेल तर तुमचे पैसे वाचू शकतील.

आज आम्ही मायलेज वाढवण्यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

रॅश ड्रायव्हिंग करणं टाळा. 

गाडी चालवताना क्लच, गिअर आणि ब्रेकचा योग्य वापर करा.

गाडी थांबवल्यावर इंजिन बंद करा. 

व्हील अलायनमेंट चेक करा.

गरजेनुसार योग्य गिअरचा वापर करा. 

टायरमध्ये हवेचे प्रेशर योग्य प्रमाणात ठेवा. 

गाडीची देखभाल आणि सर्व्हिसिंग वेळोवेळी करा. 

फ्युअल पंप योग्य रितीनं काम करत असल्याची खात्री करा.