iPhone मधील फोटो Windows मध्ये कसे ट्रान्सफर करायचे?
यासाठी तुमच्याकडे Lightning USB केबल असणे आवश्यक आहे.
iPhone आणि अपडेटेड Windows लॅपटॉप किंवा डेस्कटॉपही लागेल.
केबलचा वापर करुन आयफोनला विन्डोज PC सोबत कनेक्ट करा.
कनेक्ट झाल्यानंतर तुमचा फोन अनलॉक करा.
आता विन्डोज फाइल एक्सल्पोरर आयफोनला ऑटोमॅटीक डिटेक्ट करेल.
File explorer उघडून आयफोन आयकॉनवर टॅप करा.
कॅमेरा फोल्डर निवडा आणि फोटो थेट तुमच्या लॅपटॉपमध्ये कॉपी पेस्ट करुन घ्या.
जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे.
सर्व फोटो गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह किंवा कोणत्याही क्लाउड स्टोरेजवर अपलोड करा. याचा कुठेही एक्सेस मिळू शकतो.