मोबाईल रिचार्ज करताना पैसे कसे वाचवायचे?

मोबाईल ही आता काळाची गरज झाली आहे. 

स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण अनेक कामं घरबसल्या करू शकतो. 

परंतु त्यासाठी आपल्याला ठराविक कालावधीनंतर रिचार्ज करावा लागतो. 

आज आम्ही रिचार्ज करताना पैसे कसे वाचवायचे हे सांगणार आहोत. 

जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्ज करता तेव्हा रिचार्ज प्लॅनची तुलना करा. 

अनेकदा आपण घाईघाईत रिचार्ज करतो आणि वैधतेसारख्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. 

रिचार्ज करतेवेळी वैधता जरूर तपासा, असं केल्यानं तुम्हाला कमी पैशात जास्त दिवस लाभ घेता येईल.

अलीकडे अनेक प्लॅनवरती ओटीटी सबस्क्रिप्शनदेखील मिळते. 

जर तुम्ही हे ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्ही असे प्लॅन निवडून पैसे वाचवू शकता.