वाहनांना आग लागण्याच्या घटना रोज बातम्यांमध्ये ऐकायला मिळतात.
पण काही खबरदारी घेतली तर गाडीला आग लागण्यापासून वाचवता येऊ शकते.
अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.
गाडीमध्ये इलेक्ट्रिक डिव्हाईस बसवताना वायरिंग करताना काळजी घ्या. अनेकदा जॉइंट्समध्ये स्पार्क होतात.
कारमध्ये धूम्रपान करणे टाळावे, बऱ्याचदा यामुळेही आग लागू शकते.
अनेकदा लोक अनावश्यक वस्तू गाडीत ठेवतात. ज्यामुळे आग भडकण्याची शक्यता अधिक असते.
कोणत्याही कारणास्तव तुमच्यासोबत किंवा तुमच्या समोर अशी घटना घडली तर?
गाडीला आग लागताच वायरिंग जळते. त्यामुळे गाडीची लॉकिंग सिस्टीम जॅम होते.
अशा स्थितीत शांत राहून दरवाजाची काच फोडण्यासाठी सीटच्या हुडचा वापर करा.
गाडीतून उतरताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवा.