'या' 5 टिप्स वाढवतील Laptop चा स्पीड

लॅपटॉपचा Speed कालांतराने कमी होतो, आपल्या सर्वांना माहित आहे. हे सॉफ्टवेअर आणि आपल्या वापरण्यावर अवलंबून असतं

जर तुम्हाला लॅपटॉपची Speed पूर्वीसारखीच वेगवान ठेवायची असेल तर, तुम्ही 'या' Trick वापरु शकता

लॅपटॉपला बेडवर किंवा सोफ्यावर वापरलं, तर त्यातून निघणारी उष्णता निघून जात नाही. ज्यामुळे उपकरणं खराब होतात

जास्त उष्णता वाढली तर प्रोसेसर स्लो होतो आणि लॅपटॉप व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे लॅपटॉप नेहमी सपाट पृष्ठभागावर ठेवा

लॅपटॉपला लोकल चार्जर वापरु नका. कारण ते लॅपटॉपच्या क्षमतेचा असेलच असं नाही ज्यामुळे लॅपटॉपचा वेग मंदावतो

कूलिंग फॅन हल्ली बाजारात खूप लोकप्रिय झाले आहे, त्याचा वापर तुम्ही लॅपटॉप कूल ठेवण्यासाठी करु शकता

लॅपटॉप बराच क्लिन केला नाही तर त्यात जंक फाइल्स जमा होतात. त्याचा प्रोसेसरवर दाब वाढतो आणि लॅपटॉप स्लो होतो

जर तुम्हाला हे नको असेल तर तुमच्या लॅपटॉपमधील जंक फाइल्स क्लिअर कराव्या

अँटीव्हायरसमुळे लॅपटॉपचा वेग वाढतो, असा विचार करत असाल तर तसं नाही

अँटीव्हायरसमुळे कधी कधी तुमच्या लॅपटॉपचा वेग मंदावतो, त्यामुळे अॅण्टी व्हायरस टाळण्याची गरज आहे