फक्त 6 हजारांत हुबेहूब iPhone सारखा फोन

आपल्याकडे iPhone असावा ही अनेकांची इच्छा असते. पण त्याची किंमत परवडणारी नसते. 

त्यामुळं iPhone घेण्याचं अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. 

तुम्ही जर iPhone घेऊ शकत नसाल तरी त्याच्यासारखा दिसणारा फोन खरेदी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला हुबेहुब आयफोन सारख्या दिसणाऱ्या फोनबद्दल सांगणार आहोत. 

या स्मार्टफोनचं नाव LeTV Y1 असं आहे. हा एका चिनी ब्रँडचा फोन असून तो iphone 13 सारखा दिसतो.

या फोनमध्ये Unisoc T310 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळतं. 

एंड्रॉईड 11 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एलसीडी एचडीप्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. 

प्रायमरी कॅमेरा 8MP आहे. तर सेल्फी कॅमेरा 5  मेगापिक्सल आहे. 

या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. 

यामध्ये 3.5mm ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप सी चार्जिंग सपोर्ट मिळतो. 

हा फोन अद्याप भारतात लाँच केला गेला नाही.

या फोनची सुरुवातीची किंमत केवळ 6 हजार रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 11 हजारांपर्यंत आहे.