ठरवलेली कोणतीही कामं वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते, ती मागं पडत राहिलीत की नंतर टेन्शन वाढतं.

अनेकजण सकाळी खूप कामं ठरवतात, पण त्यातील एक-दोन कामंही कदाचित रात्रीपर्यंत पूर्ण होत नाही. 

सकाळी ठरवलेली कामं लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांची आठवण व्हावी म्हणून आपण व्हॉटस्अपचा वापर करू शकतो. 

आजकाल बहुतेक लोक व्हॉटस्अपवर अॅक्टिव असतात, व्हॉट्सअप पाहिल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही.

यासाठी तुमच्या व्हॉट्सअपमध्ये एक ग्रुप क्रिएट करा, त्याला महत्त्वाची कामे किंवा महत्त्वाची माहिती, असे नाव देऊ शकता. 

ग्रुप तयार करताना तुम्हाला त्यात कोणाला तरी अॅड करावे लागेल, त्यासाठी कोणीही एक नंबर अॅड करून ग्रुप क्रिएट झाल्यावर त्याला रिमूव्ह करा.

आता या ग्रुपला पिन करून ठेवा. (कोणताही ग्रुप किंवा नावाला सिलेक्ट केल्यास पिन करण्याचा पर्याय दिसेल)

त्या ग्रुपला पिन केल्यानं, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तो ग्रुप नेहमी सर्वात वरती दिसतो. आणि तिथे लिहिलेला मेसेजही नेहमी डोळ्यासमोर येतो.

सकाळी ठरवलेली कामं त्या ग्रुपमध्ये लिहून ठेवा. दिवसभरात जेव्हाही तुम्ही मोबाईल हातात घ्याल, व्हॉटस्अप पहाल तेव्हा त्या कामाची तुम्हाला आठवण होईल.

अशा पद्धतीनं सोपी ट्रिक वापरून आपण आपली ठरवलेली कामं पूर्ण करण्यासाठी व्हॉट्सअपचा उपयोग करू शकतो.