देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार माहितीये का?

अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत.

भारतात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. 

तुमचंही इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. 

अलीकडेच टाटानं मोस्ट अवेटेड टाटा टियागो लाँच केली आहे. 

ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे. 

टाटानं ही स्वस्त कार 7 व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे.

ही कार विविध बॅटरी आणि चार्जिंग ऑप्शनसह येते.

टाटा टिआगो देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक ठरली आहे.

टाटा टिआगोची किंमत 8.49 लाख ते 11.79 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 

कारमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड असून ती 0 ते 60 kmpl वेग केवळ 5.7 सेकंदात पकडू शकते.

8 स्पीकर सिस्टम, रेन सेंसिंग वायपर, क्रूज कंट्रोल, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, इलेक्ट्रिक ORVMs अशी फीचर्स आहेत. 

कारमध्ये 19.2 KWH पासून ते 24 KWH पर्यंत बॅटरी पॅक पर्याय उपलब्ध आहे. 

कारमध्ये 3.3 KV AC ते 7.2 KV AC चार्जिंग ऑप्शन देण्यात आला आहे.