महाराष्ट्र केसरीची गदा कोण देतं?

आणखी पाहा...!

संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरु झाली

आणखी पाहा...!

महाराष्ट्र केसरी विजेच्या पैलवानाला दिल्या जाणाऱ्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. 

आणखी पाहा...!

महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 

आणखी पाहा...!

1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती.

आणखी पाहा...!

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.

आणखी पाहा...!

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात.

आणखी पाहा...!

महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच असून, व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. वजन 8 ते 10 किलो असते. 

आणखी पाहा...!

गदा संपूर्ण लाकडी असून त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. 

आणखी पाहा...!

या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते. मागील 38 वर्षांपासून पंगांठी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतं.

आणखी पाहा...!