अहमदनगर जिल्ह्यातील सौरभ जाधवने इंडो-नेपाळ चॅंपियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.

घरची बिकट परिस्थिती असताना मेहनत आणि चिकाटीनं सौरभन स्पर्धांसाठी तयारी केली त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

कौटुंबिक कलहातून सौरभ लहान असताना वडील घर सोडून गेले. आईने हलाखीच्या परिस्थिती सौरभला मोठं केलं. सौरभनेही मेहनत, चिकाटीने ध्येयासाठी प्रयत्न केले. 

 सौरभला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. यातून क्रीडा विभागातून आपण सैन्यात भरती व्हावं यासाठी तो प्रयत्न करू लागला. 

ट्रेनरने सौरभला अपमानित केलं.यावर सौरभने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले.

परिस्थिती बिकट असल्याने बूट घेण्यासाठी सुद्धा पैसे सौरभकडे नव्हते. मात्र, अनवाणी पायाने सराव करत सौरभने जिद्दी, चिकाटी सोडली नाही. 

72 किलोमीटर अंतर 14 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करून त्याने इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. 

आतापर्यंत केलेल्या मेहनतीच्या जोरावर अनेक बक्षिसे व मेडल्स सौरभच्या नावावर जमा आहेत.

नुकत्याच झालेल्या नेपाळ येथील इंडो-नेपाळ चॅंपियनशिप 5000 मीटर रनिंग सिनिअर गटामध्ये सौरभने सुवर्णपदक पटकावले.