कोण आहे रोहन बोपन्नाची पत्नी?
भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना सानिया मिर्झासोबत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये खेळला.
सानिया मिर्झाची ही अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. अंतिम सामन्यात तिला पराभूत व्हावं लागलं.
अंतिम सामन्यात रोहन अन् सानियाला चिअर करण्यासाठी पत्नी सुप्रिया अन्नैयासुद्धा उपस्थिती होती.
सुप्रियाचे सामन्यावेळचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका चाहत्याने सुप्रिया सर्वात सुंदर स्त्री असल्याचं म्हटलं. रोहन बोपन्नानेही I Agree असं उत्तर दिलं.
रोहन बोपन्ना आणि सुप्रिया यांचे लग्न 2012 मध्ये झाले. दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.
सुप्रिया आणि रोहन बोपन्ना दोघे एकमेकांना 2010 पासून डेट करत होते. सुप्रिया एक सायकॉलॉजिस्ट आहे.
सुप्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक मोटिवेशनल कोट शेअर केले आहेत.
रोहन बोपन्नाने 2017 मध्ये फ्रेंच ओपनचं मिश्र दुहेरीतील विजेतेपद पटकावलं होतं.