IND Vs SL
पहिल्या वनेडेचे Highlights

भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 373 धावांचा डोंगर उभा केला.

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १४३ धावांची भागिदारी केली.

रनमशिन विराट कोहलीने सलग दुसरं एकदिवसीय शतक झळकावलं.

374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर ढेपाळला

 पथुम निसाका आणि कर्णधार दसुन शनाका यांच्याशिवाय इतर फलंदाज टिकले नाही.

कर्णधार दसुन शनाकाने ८८ चेंडूत १०८ धावा केल्या. यात १२ चौकार आणि तीन षटकार मारले.

भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने ३ तर मोहम्मद सिराजने २ विकेट घेतल्या.

दसुन शनाकाला ९८ धावांवर शमीने मांकडिंग पद्धतीने बाद केलं पण रोहित शर्माने खिलाडुवृत्ती दाखवत अपील मागे घेतलं.

रोहित म्हणाला की, शनाका ९८ धावांवर होता, तो या पद्धतीने बाहेर जावा असं वाटत नव्हतं म्हणून अपील मागे घेतलं.