यंदाच्या हंगामात सुरवातीच्या सामन्यात पराभूत झालेल्या चेन्नईने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मिळवला.
लखनऊला चेन्नईने १२ धावांनी पराभूत केलं.
लखनऊने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 7 बाद 217 धावा केल्या.
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 7 बाद 205 धावांपर्यंतच मजल मारता आली.
चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं.
मोईन अलीने चेन्नईकडून चार गडी बाद करत लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
लखनऊच्या काइल मेयर्सने २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं पण तो बाद झाल्यानतंर विजयाच्या आशा मावळल्या.
लखनऊचा फिरकीपटू रवि बिश्नोई आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.