BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचं यजमानपद काढून घेतलं

आशिया कप 2023 बाबत मोठी बातमी समोर येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार नाही.

आशिया कपचं यजमानपद यावर्षी पाकिस्तानकडे होतं. मात्र पाकिस्तानमधील एकूण स्थिती पाहता ते काढून घेण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या ऐवजी आशिया कप 2023 संयुक्त यूएई किंवा कतार येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आशिया कप 2023 चे आयोजन करणार नाही हे निश्चित झाल्याने पाकिस्तानला हा खूप मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुरुवातीपासूनच भारत पाकिस्तानात आशिया कपमधील सामने खेळण्यासाठी जाणार नाही असे स्पष्ट केले होते.

आशिया चषक 2023 कुठे आयोजित केला जाईल याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.