उकळत्या तेलातून हाताने वडे काढते ही महिला 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नाशिकच्या ज्योती वाघ यांचा हा वडे तळतानाचा व्हिडिओ आहे.

त्या अगदी सहज उकळत्या तेलातून हातानं वडे काढताना दिसत आहेत.

त्यांच्या या अनोख्या कौशल्यावर अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ज्योती वाघ यांनी नोकरी गेल्यानंतर हा वडापावचा स्टॉल सुरु केला.

जीवन जगण्यासाठी आपण हा संघर्ष करत असल्याचे त्या सांगतात.

ज्योती वाघ यांची ही जिद्द आणि चिकाटी अनेकासाठी प्रेरणादायी आहे. 

नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात हा नवदुर्गा फुड्स स्टॉल आहे. 

इथे चीज पाववडा, वडापाव, सँडविच, भजी अगदी चविष्ट आणि अल्प दरात मिळतात.