पापड भाजीचं भन्नाट कॉम्बिनेशन

खवय्यांना हलकाफुलका असा वाटणारा आणि चवीलाही तितकाच स्वादिष्ट वाटणारा पापड भाजी पदार्थ खूप आवडतो. 

पापड भाजीने नगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

नगरच्या कापड बाजार पेठेत आगळावेगळा अशा पापड भाजी पदार्थ मिळतो.

पापडासोबत भाजी हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं वाटतं असलं तरी याची चव भारीच आहे. 

समोसाच्या उरलेल्या पिठाच्या बारीक काप कस्टमरने मागितले त्यासोबत भाजी खाण्यासाठी दिली. त्यातूनच पापड भाजी या पदार्थाची सुरुवात झाली.

मैदा, रवा, तेल, ओवा, जिरा अशा पदार्थांचे मिश्रण करून त्यापासून पापड लाटला जातो.

पापड खातानाचा कुरमकुरम आवाज व समवेत आंबट-तिखट भाजीची लज्जतदार चव जिभेला तृप्तीची अनुभूती देते.