श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात केल्या जातात 'या' रेसिपी

खोबरं आणि टरबूजच्या बिया यांच्यापासून गोड बर्फी बनविली जाते.

या दिवशी खजूर आणि काजूपासून लाडू बनविले जातात. लहानग्यांना ते खूप आवडतात. 

कुटलेले शेंगदाणे, साखर, वेलची पावर, तूप घालून शेंगदाण्याची बर्फीदेखील बनवली जाते. 

खवा, पनीर आणि ड्रायफूट्सपासून खव्याचा लाडू बनविण्याची प्रथा काही राज्यांमध्ये आहे, 

फुल क्रिम दूध आणि खोबऱ्यापासून बनवलेली खीर या दिवशी बनवली जाते.

खवा, पिठी साखर, तूप आणि दूध यांच्यापासून मथुरा पेढा बनविण्याची प्रथा उत्तर प्रदेशमध्ये आहे. 

शिजलेल्या रताळ्याचा हलवादेखील या दिवशी बनविण्याची प्रथा आहे. 

जन्माष्टमीदिवशी खोबरं, धने पावडर, साखर आणि तूपापासून बर्फी केली जाते.

बऱ्याच ठिकाणी साखर, तूप, वेलची पावडर घालून बटाट्याचा हलवा केला जातो.