असा बनवा शाही मोघलाई पराठा
औरंगाबादमध्ये नुकताच फुड फेस्टिव्हल झाला.
या फेस्टिव्हलमध्ये शाही मोघलाई पराठ्याला मोठी मागणी होती.
हा स्पेशल पराठा घरी कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
हा पराठा बनवण्यासाठी गाजर, शिमला मिरची, फुलकोबी, धने पावडर हवी.
यासोबत गरम मसाला, चाट मसाला, मीठ, पनीर, मैदा, बेकिंग पावडर साहित्य घ्या.
सर्वप्रथम गाजर, हिरवी मिरची, पत्ता गोबी, फुलकोबी यांचा किस तव्यावर भाजून घ्या.
यानंतर मैद्याचा पीठ मळून त्याची गोल आकाराची पोळी लाटून घ्या.
या पोळीवर भाजलेला मसाला टाका आणि पोळी चारही बाजूने झाकून घ्या.
त्यानंतर तव्यावर तेल टाकून पराठा भाजून घ्या. शाही मोघलाई पराठा तयार आहे.