50 भाज्यांची लसूण-कांद्याशिवाय बनवा ग्रेव्ही

साहित्य : दीड किलो टोमॅटो, 2 शिमला मिरची, 4 हिरव्या मिरच्या, तेल, 10-12 लवंग, 10-12 काळेमीरे, 

15-20 काजू, कापलेलं आलं, 3-4 वेचली, 2 तमालपत्री, 1 दालचिनी. हळद, 4 लाल मिरची, कोथिंबीर, जिरे. 

गॅसवर पहिल्यांदा कढईत तेल घाला, त्यात मसाला गरम करून घ्या. त्याचा सुंगध सुटेल. 

त्यानंतर त्यात कापलेली शिमला मिरची, हिरवी मिरची, आलं आणि कापलेली टोमॅटो घाला. 

कढईत पाणी न टाकता तेलातील सर्व पदार्थ परतत रहा. टोमॅटोच्या पाण्याने मिश्रण पातळ होत राहील. 

नंतर हळद, लाल मिरच्या, कोथिंबिरी, धने, जिरे आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. गॅस फुल करा. 

टोमॅटो पूर्ण मॅश होईपर्यंत तेलात मिश्रण शिजवा. त्यानंतर मिश्रणातील जे मोठे मसाले दिसत आहेत, ते काढा. 

कढईतील सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात भरून चांगलं ग्रॅंड करून घ्या. 

एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद, 3 चमचे मिरची पावडर, 5  चमचे धने पावडर आणि 2 चमचे जिरा पावडर घ्या आणि त्यात थोडं पाणी एक मिश्रण तयार करा. 

कढईत 5 मोठे चमचे तेल टाकून हिंग फोडणी द्या. त्यानंतर बाऊलमधील मिश्रण तेला टाका. नंतर एक चमचा साखर घाला. 

त्यामध्ये ग्रॅंड केलेली कच्ची ग्रेव्ही टाका आणि चांगली शिजवून घ्या. तयार झाली तुमची 50 भाज्यांची ग्रेव्ही.