नागपुरची मटका रोटी बोले तो माहोल!

प्रत्येक शहराला आपली खास ओळख लाभलेली असते. त्याप्रमाणे त्या शहराची आपली आगळीवेगळी खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण असते.

 सावजी झणझणीत चिकन, मटण, तसेच आमरस, बासुंदी सोबत हमखास फर्माईश केली जाणारी माठावरच्या लांब रोटी नागपूरची फेमस आहे.

लांब रोट्यांनी नागपूरची एक आगळीवेगळी ओळख जपली असून नागपूरच्या खाद्य संस्कृतीचे वैभव बनले आहे.

नागपुरातील रामेश्वरी, शताब्दी चौक, इंदोरा, बजाज नगर परिसात या रोटी मिळतात. 

गृह उद्योग करणाऱ्या महिला देखील या रोटी बनवून देतात.

लांब रोट्या तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्याचा आणि मेहनतीचे काम आहे.मात्र त्यांची चव आणि त्यातून मिळणारा आनंद खवय्यांसाठी काही औरच असतो.

लांब रोट्या प्रामुख्याने मटण, चिकन, बासुंदी, खीर, आंबरस, पटोडी अशा पदार्थासोबत चवीने खाल्ल्या जातात.