श्रावणात बनवा टेस्टी 'व्हेज फिश करी'

साहित्य : ओलं खोबरं, टोमॅटो, लिंबू, कांदा, बेसण, कच्ची केळी, लसूण...

धने, बेडगी मिरची, तिखट, हळद, गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.

केळीचे दोन भाग करून घ्या. पाणी गरम करा, त्यात मीठ घाला आणि 10 बाॅईल करून घ्या. 

मिक्सरमध्ये ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण, बेडगी मिरची, धने, हळद ग्राइंड करून घ्या. 

बाॅईल केलेल्या केळीची साल काढा. नंतर एका भांड्यात बेसण, मीठ, हळद, हिंग, तिखट, ओवा आणि पाणी याची पेस्ट करून घ्या. 

पेस्ट केळी डीप करा, नंतर कोरड्या बेसणमध्ये घोळून घ्या आणि नंतर केळी तेलात तळून घ्या. 

नंतर कढईत तेल गरम करा. त्यात पेस्ट आणि ग्राइंट केलेला मसाला टाका. नंतर त्यात पाणी, मीठ आणि कोकम घाला. ही ग्रेव्ही वाफवून घ्या. 

त्यानंतर त्यात फ्राय केलेले केळीचे काप घाला. त्यावर कोथिंबीर घालून 3 मिनिटांसाठी वाफवून घ्या. 

अशाप्रकारे टेस्टी 'व्हेज फिश करी' तयार झाली आहे. आता श्रावणातही खा ही टेस्टी व्हेज फिश करी...

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!