देशातील सर्वात हटके पिझ्झा मुंबईत, भट्टीतून थेट प्लेटमध्ये

पिझ्झा हे अनेकांचे आवडते फास्ट फूड आहे. चीज पिझ्झा, चिकन पिझ्झा, व्हेज पिझ्झा, मशरूम पिझ्झा, तंदूरी चिकन पिझ्झा असे पिझ्झाचे अनेक प्रकार आहेत. 

यामध्ये तुम्ही काही प्रकार खाल्ले सुद्धा असतील. पिझ्झावर गेल्या काही वर्षांत अनेक प्रयोग झाले आहेत. 

यातच आता भट्टी पिझ्झा या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. 

मुंबईतील चेंबूर मध्ये असलेल्या स्मोकिडो या कॅफे मध्ये चक्क भट्टीवर तयार केलेला पिझ्झा मिळतो.

कोरोनाच्या काळात हेमंत जैन यांनी स्मोकिडो या कॅफेची सुरुवात केली आणि त्यांनी भट्टी पिझ्झा बनवण्याचे ठरवले. 

भारतीय पद्धतीने पण इटालीयन चव या दोघांची सांगड घालून हा भट्टी पिझ्झा तयार करण्यात येतो. 

हा पिझ्झा भट्टी मध्ये तयार करण्यात येत असल्यामुळे याला एक वेगळी चव खाताना येते.

या कॅफे मध्ये फक्त व्हेज आणि जैन पिझ्झा उपलब्ध आहे. 

इतर पिझ्झा प्रमाणे हा पिझ्झा तयार झाल्यावर फक्त इलेक्ट्रीकल ओव्हन मध्ये न टाकता चक्क भट्टीमध्ये टाकण्यात येतो. 

भट्टी मध्ये 200 ते 300 तापमानावर पिझ्झाला गरम केले जाते. यासाठी खास लाकूड वापरण्यात येते. यामुळे या पिझ्झाला एक वेगळी चव येते. 

लाकूड आणि धूर यामुळे पिझ्झा हा चुलीवर तयार केल्यासारखी चव या पिझ्झाला मिळते. त्यामुळे अनेक खवय्ये या ठिकाणी भेट देत आहेत.

कुठे मिळतो हा भट्टी वरील पिझ्झा? 

आचार्य कमर्शियल कॉम्प्लेक्स, शॉप न. ०७ चोटीराम गिडवाणी रोड, क्युबिक मॉल जवळ, चेंबूर, मुंबई - ४०००७४.