गृहिणींनो! 'या' किचन टिप्स आजमवा आणि टेन्शनमुक्त व्हा

किचनमधील कामं कधी-कधी खूप अवघड होऊन जातात. त्यात वेळही जातो. 

अशावेळी किचनमधील काही महत्त्वाच्या टिप्स कामी येतात, त्या टिप्स पाहुया...

पदार्थ शिजवताना प्रेशर कुकरच्या बाहेर पाणी येते. अशावेळी कुकरमध्ये पदार्थाच्या भांड्याखाली एक वाटी ठेवून शिजवा. 

किचनमधील कात्रीची धार गेलीय, तर मीठाच्या डब्यात 3 मिनिटं कात्री चालवा, कात्रीला धार येईल. 

शिजलेल्या भातात पाणी राहिलं, तर त्यात एक ब्रेडचा पीस घाला आणि नंतर गॅसबंद करा. 

लसूण सोलायचा असेल, तर गरम पाण्यात काही वेळ लसून टाका, नंतर अगदी सहज लसून सोलला जाईल.

हिरवी चटणी काही कालावधीनंतर काळी पडते, अशावेळी चटणी करताना त्यात 1 चमचा दही घाला. 

सफरचंद कापल्यानंतर थोड्यावेळी काळे पडतात. अशावेळी सफरचंदाच्या तुकड्यांना लिंबूपाण्यातून काढा, खूप वेळ फ्रेश राहतात. 

गॅसवर कोणतीही भाजी भाजणार असाल, तर त्याला थोडं तेल लावा. त्याची साल लवकर सोलले जाईल अन् गॅसही अस्वच्छ होणार नाही.