टेस्टी पनीर टिक्का कसा तयार कराल?

साहित्य : 500 ग्रॅम पनीर, अर्धा चमचा मेथीचे दाणे, काळे तीळ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट...

अर्धा चमचा मोहरीचं तेल, 1 चमचा गरम मसाला, पावचमचा तिखट, 3 चमचे लोणच्याचा मसाला, अर्धी वाटी दही.

मध्यम आचेवर कढई ठेवून धने, मेथीचे दाणे, काळे तीळ, भाजून घ्या. नंतर भाजलेले साहित्य प्लेटमध्ये काढून घ्या. 

बाऊलमध्ये दही, तिखट, मोहरी पावडर, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि लोणचं मसाला मिक्स करा. 

नंतर भाजलेले साहित्य दही आणि इतर मसाल्यात एकजीव करून घ्या. 

त्यानंतर पनीरचे चौकणी आकाराचे चार तुकडे कापून घ्या. 

अर्ध तास मसाल्यात पनीर मिक्स करून ठेवा. नंतर नाॅनस्टिक पॅनववर तेल गरम करा. 

पनीरच्या तुकड्यांना टूथपिक लावून तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्या. 

सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत फ्राय करा. अशाप्रकारे पनीर टिक्का तयार झाला आहे. चटणी, सही  किंवा साॅससोबत खायला सुरूवात करा. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!