टेस्टी आणि गरमागरम बेसणाची अप्पे कसे बनवाल?
साहित्य : 2 कप बेसण, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, 2 चिरलेला मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या...
अर्धा चमचा जीरा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा इनो, मीठ आणि तेल.
पहिल्यांदा बेसणात पाणी घालून घट्ट मिश्रण करून घ्या.
त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, मीठ, हळद, जिरे, बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या.
दहा मिनिटांसाठी बेसणाचे मिश्रण बाजूला ठेवा.
अप्पेचा तवा गॅसवर ठेवा आणि त्याला थोडं तेल लावून त्या साच्यामध्ये मिश्रण घाला. त्यावर मिनिटांसाठी झाकण ठेवा.
त्या अप्प्यांना थोडंस तेल लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत व्यवस्थित भाजा.
एका प्लेटमध्ये सर्व अप्पे काढून, राहिलेल्या मिश्रणाचे अशाचप्रकारे अप्पे करून घ्या.
बेसणाचे अप्पे तयार झाले आहेत, टोमॅटो कॅचपबरोबर तुम्ही गरम अप्पे खाऊ शकता.