टेस्टी आणि खमंग शेव भाजी कशी कराल? 

शेव भाजी तयार करणे सोपं आहे. फक्त कशी करायची ते जाणून घेऊया...

साहित्य : दीड कप शेव, दीड कप राई, दीड चमचा जिरे, चिमुटभर हिंग, 1 चमचा लसूण पेस्ट,

2 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, 2 टोमॅटो, दीड चमचे हळद, लाल तिखट, धने पावडर, मीठ, तेल.

कढईमध्ये तेल गरम करा. त्यात राई, जिरे आणि हिंग टाकून फोडणी द्या. 

नंतर लसून पेस्ट व कापलेल्या हिरव्या मिरच्या घाला. त्यात कापलेल्या कांदा- टोमॅटो ब्राऊन होईपर्यंत भाजा.

त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालू चांगलं भाजू घ्या. 

त्या मिश्रणात थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं शिजवून घ्या. पाणी उकळलं की त्यात शेव मिक्स करून घ्या. 

लिबांच रस घालून पुन्हा 1 मिनिट शिजवा. अशाप्रकारे तुम्ही शेव भाजी तयार झाली आहे. 

त्यावर मस्तपैकी कोथिंबीर चिरून टाका आणि चपाती किंवा पावासोबत खा. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!