सोलापुरातील प्रसिद्ध शेंगा चटणी 

सोलापुरातील नरसिंग बाळकृष्ण सिद्धे यांनी 1998 मध्ये या शेंगा चटणी व्यवसायाला सुरुवात केली. 

सोलापूरच्या चादर, ज्वारीप्रमाणे ही शेंगदाणा चटणीदेखील खूप प्रसिद्ध आहे. 

शेंगा चटणी बनवण्यासाठी प्रथम टरफलातील शेंगा हलक्या उन्हात वाळवल्या जातात.

त्यानंतर काळ्या पडलेल्या, खवट चव असणाऱ्या शेंगा या निवडून वेगळ्या केल्या जातात.

त्यानंतर महत्वाची स्टेप, विशिष्ट टेंपरेचरवर भट्टीमधून शेंगा भाजून टरफले वेगळे केले जातात.

त्यानंतर चाळणीच्या माध्यमातून पूर्ण शेंगदाणे निवडून घेतले जातात.

नंतर शेंगदाणा चटणीसाठी आवश्यक असणारे सर्व मसाले मिक्स केले जाते.

आता जोपर्यंत शेंगांमधून तेल निघत नाही तोपर्यंत ते उखळात कांडुन घेतले जाते. 

अशाप्रकारे ही सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी तयार होते.