घरातच सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू करा

साहित्य : 1 कप पांढरे तीळ, दीड कप खवा, दीड कप गूळ आणि 2 चमचे कॅनोला तेल.

गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर तीळ टाका. 

सोनरी रंग प्राप्त होत नाही तोपर्यंत तीळ हालवत रहा. त्यानंतर एका प्लेटमध्ये तीळ काढून घ्या. 

नंतर पुन्हा पॅनमध्ये थोडं पाणी घ्या, त्यात गूळ टाका. हालवत रहा आणि पॅनला गूळ लागणार नाही. 

तोपर्यंत गूळ चांगला पाण्यात मिसळून पाकसारखा पातळ होईल. 

त्यात लगेच खवा आणि तीळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. 

व्यवस्थित मिक्स केले की, हातात घेऊन त्याचे लाडू बांधून घ्या. 

तुम्ही यामध्ये ड्रायफूड वापरू शकता. त्यासाठी तुपात ड्रायफूड भाजून तीळ आणि खव्यात मिक्स घ्या. 

थंड वातावरणात हे टेस्टी तिळाचे लाडू खायला मस्त वाटते.