झटपट बटाटा उत्तप्पा कसा बनवाल?
साहित्य : चिरलेले 3 बटाटे, चिरलेले 2 कांदे, कापलेली हिरवी मिरची, 1 कप बेसण, अर्धा वाटी सूजी...
अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर, मीठ, 1 कप दही आणि आवश्यकतेनुसार तेल.
एका भांड्यात बेसण, चिरलेला बटाटा, कांदा, हिरवी मिरची, सूजी आणि मिरची पावडर घ्या.
त्यानंतर चिरलेली कोथिंबीर, मीठ, दही आणि पाणी घालून उत्तप्पा करता येतील असे पीठ तयार करा.
गॅसवर नाॅन स्टिक तवा गरम करा. त्यावर दोन थेंब तेल घालून ओल्या कपड्याने तो तवा पुसून घ्या.
नंतर तव्या एक चमचा तेल पसरून घाला आणि त्यानंतर ते उत्ताप्पाचं मिश्रण पसरवा.
सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत दोन्ही बाजुंनी तो उत्ताप्पा चांगला भाजून घ्या.
अशा प्रकारे टेस्टी बटाट्याचा उत्तप्पा तयार झाला आहे.
टोमॅटो चटणी किंवा पुदीना चटणीसोबत गरमागरम उत्तप्पा खायला सुरू करा.