गणपती बाप्पाचे आवडते 'मोदक' कसे बनवाल?
साहित्य : 2 वाट्या तांदळाचे पीठ, 1 चमचा देशी तूप, 1 वाटी किसलेले खोबरे, 2 चमचे गूळ...
2 चमचे बारीक चिरलेले काजू, 2 चमचे चिरलेले बदाम आणि वेल पावडर.
खोबरं किसून घ्या. गॅसवर तवा ठेवून त्यात तूप घाला. खोबऱ्याचा किस भाजून घ्या.
त्यानंतर त्यात गूळ घाला. खोबऱ्यात गूळ एकत्र करा आणि मंद आचेवर शिजवा.
त्यामध्ये वेलची पावडर घाला. खोबऱ्यावर गुळाचा लेप झाल्यावर गॅस बंद करा.
नंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढा, अशाप्रकारे तुमचं मोदकाचं सारण तयार झाले आहे.
गॅसवर एक भांडं ठेवून त्यात पाणी टाका, त्यात तूप घाला. उकळी आली की, तांदळाचे पीठ घाला.
पीठ अर्धे शिजले की, ताटात काढा आणि हाताला तूप लावून पीठ मळून घ्या.
पीठाचे एक-एक गोळे करून त्यात सारण भरून गोळ्याचे तोंड बंद करा.
नंतर मलमलच्या कपड्यात हे मोदक ठेवा आणि स्टीमर करून 15 मिनिटं शिजू द्या. तुमचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत.