चविष्ट डाळीचे पराठे कसे बनवायचे? 

बटाट्याचे पराठे सर्वांनीच खाल्ले असतील. पण, डाळीचे पराठे कधी खाल्लेत का? नाही ना... चला दाळीचे पराठे रेसिपी पाहुया... 

1 कप गव्हाचे पीठ, 2 चमचे तेल, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे, थोडीशी हळद...

चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तूप.

2 तास पाण्यात डाळीला पाण्यात भिजवून ठेवा. नंतर गव्हाचे कणीक व्यवस्थित मळून घ्या. 

पाण्यातून डाळ काढून कुकरमध्ये 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. ती डाळ मिक्सरमध्ये बारीक करून नंतर तेलात गरम करून घ्या. 

गरम तेलात हिंग, जिरे फोडणी द्या.  त्यात बारीक केलेली डाळ, मीठ, हळद आणि तिखट घाला. 

ती डाळ कोरडी होईपर्यंत पॅनमध्ये गरम करा आणि नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. 

पीठा गोळ्यात डाळ घालून पोळीसारखे लाटा आणि गरम तव्यावर भाजून घ्या. 

रायता, दही किंवा चटणीसोबत डाळीचा पराठा खाऊ शकता. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!