कृष्ण जन्माष्टमीला दहीकाला नैवेद्य कसा कराल?

भारतात गोकुळाष्टमी सणाचे खूप महत्त्व आहे. तर यावेळी दहीकाला नैवेद्याची रेसिपी पाहुया...

साहित्य : दीड वाटी दही, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 1 कापलेली काडकी, दीड वाटी पोहे, अर्धा कप किसेलेलं खोबरं...

काजू, कोथिंबीर, 4 पानं कढीपत्ता, चिमूटभर हिंग-जिरं, अर्धा चमचा मोहोरी, मीठ, 2 चमचे तूप. 

पहिल्यांदा पोहे स्वच्छपणे धुवून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या. 

त्यामध्ये मीठ, डाळिंबाची दाणे, काकडी, कोथिंबीर आणि दही यांची मिश्रण करून घ्या. 

गॅसवर कढई ठेवा, त्यात तूप घाला आणि मिरचीचे तुकडे घालून तळून घ्या. 

त्यानंतर यामध्ये जिरं, राई, मोहोरी आणि सर्वात शेवटी चिमूटभर हिंग घालून गॅस बंद करा. 

तयार झालेली फोडणी पोह्याच्या मिश्रणात घाला आणि एकजीव करा. 

अशाप्रकारे गोपाळाष्टमीचा नैवेद्य दहीकाला तयार झाला आहे.