नवरात्रौत्सवासाठी हे 9 हटके उपवासाचे पदार्थ
या उपवासाला भेंडी, राजगिरा, लाल भोपळा, काकडी, रताळे यांसारख्या भाज्या चालतात. तसेच उपवासाला सर्व प्रकारची फळे चालतात. या भाज्या आणि फळे एक किंवा दोन दिवस आधीच आणून निवडून ठेवावीत
उपवासाच्या अनेक पदार्थांना दाण्याचा कूट लागतो. त्यामुळे दाणे भाजून कूट करुन ठेवा. तुम्हाला हा कूट पटकन वापरता येईल.
उपवासाच्या दिवसात खजूर रोल, दाण्याचे लाडू, सुकामेव्याचे लाडू असे पदार्थ घरच्या घरी करुन ठेऊ शकता.
नवरात्र उत्सवाच्या महिन्यात ऊन असतं. म्हणून ताक, सरबत, शहाळे, सोलकढी ही पेये घेऊ शकता. तसेच सरबतासाठी लिंबू आणणे, ताकासाठी दही लावून ठेवता येईल.
उपवासाला नारळही चालतो. त्यामुळे तुम्ही नारळाची चटणी करु शकता किंवा उपवासाच्या पदार्थांवर नारळ घालू शकता.
नेहमी साबुदाणा किंवा बटाटा खाण्यापेक्षा उपवासाच्या थालिपीठाची भाजणी, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठ हे पदार्थ खाऊ शकता. कारण ते पचायला हलके असते आणि यामुळे पोटही भरते.
उपवासाचे बटाटा पापड, साबुदाण्याच्या पापड्या, चकल्या, घरी केलेले वेफर्स हे घरच्या तेलात किंवा तुपात तळून खाऊ शकतात.
साजूक तूप हा उपवासाला लागणारा एक महत्त्वाचा घटक आहे. हे तूप तुम्ही आधीच नियोजन करुन लोणी करुन कढवून ठेवावे.
उपवासात अॅसिडीटी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी दही, दूध, ताक हे पदार्थ आहारात पाहिजेत.