पाणीपुरी हे नुसते नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी आवडत नाही असा खवय्या मिळणं तसं दुर्मीळच.
नागपुरातील चिराग का चस्का पाणीपुरी सेंटरमधील तब्बल 7 इंच आकार असलेली बाहुबली पाणीपुरी जरा हटके आहे.
पाणीपुरीचे 7 प्रकारचे फ्लेवर आहेत त्यात प्रामुख्याने नागपूरचे फेमस सावजी पाणी, मँगो, गारलिक, दहिभल्ला, जिरा, रेग्युलर पाण्याचा समावेश आहे.
7 इंच एवढ्या मोठ्या आकाराची पाणीपुरी, त्यात सर्व प्रकारचे फ्लेवर पाणी, आलुची चटणी, त्यावर दही, शेव, बुंदी, चाट मसाला कोथिंबीर अशा साहित्याने तयार होते.
पाणीपुरी एका घासात खाने म्हणजे आव्हानच आहे. एका घासात ही पाणीपुरी खाणाऱ्याला विशेष पारितोषिक देण्यात येते.
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या चिराग पवार यांचे चिराक का चस्का नावाने पाणीपुरी सेंटर आहे.
चिराग का चस्का चाट सेंटरमध्ये आज एकूण 17 लोक काम करत आहेत. चिरागसह आज त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे.