...तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला असता
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर तिरंगी लढत झाली.
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
उमेदवारी मागे घ्यावी म्हणून उद्धव ठाकरे, अजित पवारांनी त्यांना फोन केले. मात्र, कलाटेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला.
जनतेचा आग्रहास्तव मी ही निवडणूक लढतोय, असे ते म्हणाले होते.
अखेर भाजपच्या आश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी ही लढत झाली.
या तिरंगी लढतीमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते.
आणि अखेर आज निकालानंतर ते दिसून आले आहे. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत.
राहुल कुलाटे आणि नाना काटे या दोघांपैकी जर कुणी एक जण या निवडणुकीत उभे राहिले असते, तर याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता.
आगामी काळात भाजपच्या अश्विनी जगताप कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.